शेतकऱ्यांनो, उसाचे पाचट जाळू नका; शेतात कुजू द्या; तज्ञांच मत

1 min read

जुन्नर दि.१९:- यंदाच्या रब्बी हंगामात ही गहू, ऊस, कांदा आणि हरभरा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. आपल्या राज्यातही ही दोन्ही पिके मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जात आहेत. गव्हाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यात या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. मात्र या राज्यातील शेतकरी गहू काढणी झाल्यानंतर गव्हाचे धसकट जाळून टाकतात.

यामुळे तेथील राज्यांमध्ये प्रदूषणाचा स्तर वाढत आहे. शिवाय राष्ट्रीय राजधानी दिल्ली या राज्यांच्या जवळच असल्याने दिल्लीमधीलही प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हेच कारण आहे की, लोकसभेमध्ये देखील दरवर्षी या मुद्द्यावर चर्चा होत असते. या राज्यातील शेतकऱ्यांनी गव्हाचे धसकट जाळू नये यासाठी जनजागृती केली जात आहे.

शासनाच्या माध्यमातून गव्हाच्या धसकट पासून इतर उत्पादने तयार करता यावेत त्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रात देखील गव्हाचे धसकट आणि उसाचे पाचट मोठ्या प्रमाणात जाळले जाते. शेतकऱ्यांचा असा समज आहे की गव्हाचे धसकट आणि उसाचे पाचट जर शेतात जाळले तर जमिनीची सुपीकता वाढते.

अशा परिस्थितीत कृषी तज्ञांनी जर पिकांचे अवशेष अर्थातच गव्हाचे धसकट, उसाचे पाचट जाळले तर खरंच जमिनीतील कर्ब वाढतो का ? जमिनीची सुपीकता वाढते का ? याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. कृषी तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे शेती पिकांचे अवशेष झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते ही गोष्ट नाकारून चालणार नाही.

शिवाय शेती पिकांचे अवशेष झाले तर मातीची सुपीकता देखील कमी होते. यामुळे शेती पिकांचे अवशेष जाळण्याऐवजी तसेच जमिनीत पडू दिले पाहिजे. उसाचे धसकट आणि गव्हाचे पाचट जाळण्याऐवजी तसेच शेतात पडू दिले पाहिजे.

असे केल्यास जमिनीची सुपीकता वाढते यामुळे पिकाची जोमदार वाढ होते. म्हणजेच हे अवशेष जमिनीतच कुचले तर खत तयार होते आणि याचा फायदा पुढील पिकाला होतो. यामुळे पिकांचे अवशेष जाळणे टाळले पाहिजे असा सल्ला कृषी तज्ञांनी यावेळी दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे