स्वातंत्र्यवीर युवा फाउंडेशन च्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील २४३ विद्यार्थ्यांची मोफत दंत आरोग्य चिकित्सा

1 min read

बेल्हे दि.१८:- स्वातंत्र्यवीर युवा फाउंडेशन बेल्हे (ता.जुन्नर) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं १ शाळेत मोफत दंत चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले. डॉ.कुंडलिक आव्हाड डॉ. वैभव साठे डॉ.सावन पालवे यांच्या उपस्थितीत शिबिर पार पाडण्यात आले.याप्रसंगी शाळेतील 243 विद्यार्थ्यांची मोफत दंत आरोग्य चिकित्सा करण्यात आली. डॉक्टरांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना दातांची काळजी कशी घ्यावी. दात कसे घासावेत, त्याचबरोबर व्यसनाधीनतेपासून दातांचा बचाव कसा करावा इत्यादी अनेक गोष्टी प्रात्यक्षिक मधून दाखविल्या. मुलांना दातांचे आरोग्य व त्याचे महत्त्व पटवून दिले.सर्व मुलांना याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर युवा फाउंडेशनचे सदस्य नारायण पवार , नारायण कोकणे, हरकु विलास पिंगट यांनी सर्व मुलांना खाऊ वाटप केले. रसिक गांधी (ओम मेडिकल बेल्हे) यांनी शाळेला प्रथमोपचार पेटी भेट देण्यात आली.
शाळेत शिबिराचे आयोजित केल्यामुळे फाउंडेशनच्या वतीने सर्व डॉक्टरांना तुकारामांचे अभंग गाथा व ज्ञानेश्वरी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक बेलकर मॅडम व सर्व शिक्षक वृंद ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुप्रिया बांगर व सर्व सदस्य यांनी फाउंडेशनचे व सर्व डॉक्टरांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे