एसटीच्या अधिकृत थांब्यावर ३० रुपयांत नाश्ता देण्यास टाळाटाळ; महामंडळाचे कारवाईचे आदेश

1 min read

पुणे दि.१५:- एसटीने प्रवास करत असताना जेवणासाठी बस ज्या हॉटेलवर स्टॉप घेते तिथे प्रवाशांना तिकीट दाखवून ३० रुपयांमध्ये नाश्ता मिळतो. गेली अनेक वर्षे ही योजना अस्तित्वात आहे. सध्या एसटीच्या अधिकृत थांब्यांवरील हॉटेलात ३० रुपयांत नाश्त्याच्या बाबतीत तसेच बाटली बंद पाणी ‘नाथजल’ छापील किंमतीपेक्षा जादा दराने विकल्याबाबत हिवाळी अधिवेशनातील लाेकप्रतिनिधींकडून विचारणा हाेत आहे. त्यामुळे महामंडळाने अशा अधिकृत थांब्यावर कारवाई करावी, असे आदेश एसटी महामंडळाचे महाव्यस्थापक (नियाेजन आणि पणन) यांनी पत्रक काढून दिले आहेत.
एसटी महामंडळाने बसेसकरिता मंजूर केलेल्या खासगी थांब्यांवर हॉटेल मालकाने ३० रुपयांमध्ये चहा आणि नाश्ता देणे उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. तरीही काही हॉटेल चालक या आदेशाचे पालन करीत नाहीत, अशा अधिकृत थांब्याची महिन्यातून किमान दाेन वेळा तपासणी व्हावी, असे आदेशात नमूद केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे