जुन्नरचे आशुतोष डुंबरे ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त

मुंबई दि.१२: ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी जुन्नर तालुक्यातील ओतूर गावचे आयपीएस अधिकारी आशुतोष डुंबरे यांची बदली करण्यात आली आहे. सध्या या पदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जगजीत सिंग यांना पदोन्नती देत त्यांच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या महासंचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील दोन आयपीएस अधिकाऱ्यांची बदली आणि पदस्थापनेचे आदेश सोमवारी गृह विभागाने काढले. त्यानुसार ठाण्याच्या आयुक्तपदी असलेल्या जगजीत सिंग यांच्या जागी स्थानिक पसंती असलेल्या आशुतोष डुंबरे यांची निवड केली आहे.

महाविकास आघाडी सरकार पायउतार होताच सत्तेत आलेल्या महायुती सरकारने आशुतोष डुंबरे यांची नियुक्ती गुप्तवार्ता विभागात केली होती. यानंतर आता गृह विभागाने त्यांची ठाण्याच्या पोलीस आयुक्त पदावर नेमणूक करून त्यांच्यावर अधिक जबाबदारी दिली आहे.

हे पद अप्पर पोलीस महासंचालक श्रेणीत अवनत करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे