एसटीतही सुट्ट्या पैशांची कटकट सुटणार; क्यूआर कोड स्कॅन करून देता येणार तिकिटाचे पैसे; गूगल-पे, फोन-पेचा वापर

1 min read

पुणे, दि.११:- राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सर्व बसमध्ये आता प्रवाशांना एसटीचे तिकीट ऑनलाइन देता येणार आहे. त्यामुळे सुट्ट्या पैशांची कटकट सुटणार असून, जागेवर बसून वाहकाकडील मशीनवर असलेल्या क्यूआर कोड स्कॅन करायचा आणि आपले तिकीट घ्यायचे. त्यामुळे प्रवाशी आणि एसटीला याचा फायदा होणार आहे.

पुणे विभागातील सर्व आगारांमधून धावणाऱ्या एसटी बसमध्ये ही ऑनलाइन तिकीट काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.भाजीवाला, चहावाल्यापासून मॉलपर्यंत सगळीकडे ऑनलाईन पैसे देवाण- घेवाण करण्याची सुविधा आहे.

मात्र, दररोज लाखो रुपयांचे कलेक्शन असलेल्या सार्वजनिक वाहतुकीमध्ये ऑनलाईन सुविधा का नाही? असा प्रश्न प्रवाशांकडून अनेकवेळा उपस्थित केला जात होता. त्याप्रमाणे एसटीतही दररोज सुट्टे पैसावरून प्रवाशी आणि वाहक यांच्यात शाब्दीक वाद होत असे.

त्यामुळे एसटी विभागाने माहिती तंत्रज्ञानाला आत्मसात करून प्रवाशांना ऑनलाइन तिकीट मिळावे, यासाठी पहिल्या टप्यात क्यूआर कोडच्या माध्यमातून तिकीट देण्याची व्यवस्था सर्व बसमध्ये करण्यात आली आहे. तर, पुढील टप्प्यात प्रवाशांना डेबीट व क्रेडीट कार्डवरून देखील तिकीट काढण्याची सोय केली जाणार आहे.

तसेच, वाहकांना देखील आता रोख पैसे जास्त बाळगावे लागणार नाहीत. एसटी महामंडळाने सर्व विभागांना ही सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऑनलाइन तिकीट काढताना कोणतेही पैसे कमी झाले आणि तिकीट न आल्यास प्रवाशांना मदत मिळणार आहे. त्यासाठी एसटीकडून ‘४००’ हा हेल्पलइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे.

तसेच, नागरिक ८८००६८८००६ या क्रमांकास संपर्क साधू शकतात. त्याबरोबरच wecare@airtelbank.com येथे संपर्क साधून नागरिक मदत मागू शकतील. हे क्रमांक हे २४ तास उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे