नाथ सागर जलाशयात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प होऊ नये म्हणून मच्छीमार संघटना, ट्रस्ट,पंच सामाजिक संस्था आक्रमक
1 min read
नगर दि.४:- जायकवाडी नाथ सागर जलाशयात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प होऊ नये म्हणून मच्छीमार संघटना, ट्रस्ट, पंच सामाजिक संस्था यांच्या वतीने तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर या ठिकाणी येथे निवेदन दिले.
सविस्तर माहिती अशी की संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, नेवासा, शेवगाव या तालुक्यातील पण पसारा परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्प तयार करण्याची पूर्ण तयारी झाली असून वित्तमंत्री व केंद्रीय मंत्री भागवतजी कराड यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प होताना दिसत आहे.
त्यामुळे पशु पक्षी, पर्यटन व मच्छिमार तसेच जैविक विविधतेवर मोठा परिणाम होणार असून शासनाने हा प्रकल्प तातडीने रद्द करण्यात यावा. यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर निवेदन देण्यात आले आहे.
येत्या सात डिसेंबर रोजी नेवासा तहसील कार्यालय व पैठण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सामूहिक मच्छिमार समाज यांच्यावतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
यासंदर्भात सर्व विभागीय कार्यालयांना निवेदन दिले असून तातडीने प्रकल्प रद्द न झाल्यास सर्व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय व पाटबंधारे विभाग कार्यालय दिल्ली येथील प्रधानमंत्री कार्यालय
राष्ट्रपती कार्यालय सर्व कार्यालयांना राज्य आणि केंद्रातील सर्व मंत्रालयांना लेखी निवेदन देऊन कळविले असून तातडीचे शासनाच्या व प्रशासनाच्या वतीने तातडीने निर्णय घेण्यात यावे व सात तारखेच्या आत लेखी स्वरूपात संबंधित संस्था ट्रस्ट कमिटी पंच यांच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात यावे,
असे न झाल्यास सात तारखेला दुपारी बारा वाजता सामूहिक अमरण उपोषण करणार आहेत. यामध्ये अनुचित प्रकार घडल्यास याला शासन प्रशासन सरकार जबाबदार राहील कहार समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले आहे.