जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर १ ला लोकसहभागातून ब्लूटूथ स्पीकर भेट
1 min readबेल्हे दि.१०:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर १ (ता.जुन्नर) शाळेला लोकसहभागातून १५ हजार रुपये किमतीचा ब्लूटूथ स्पीकर भेट देण्यात आला. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता दानशूर व्यक्तिमत्व अनिल गुंजाळ यांनी हा संच शाळेला भेट दिला.
याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रिया बांगर, उपाध्यक्ष सोयल बेपारी सर्व सदस्य त्याचबरोबर जनाकु डावखर, उपसरपंच राजू पिंगट सर्व ग्रामपंचायत सदस्य शिक्षक वृंद यांनी याबद्दल त्यांचा सन्मान केला व शाळेला दिलेल्या देणगी बद्दल आभार व्यक्त करण्यात आली.
स्पीकर संच दिल्यामुळे मुलांना शालेय परिपाठ त्याचबरोबर इतर अनेक बाबतीत स्वीपरची मदत होणार असल्यास शाळेचे मुख्याध्यापक मीरा बेलकर यांनी सांगितले व देणगी दिल्याबद्दल देणगीदारांचे आभार मानले.