यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव केंद्रस्तरीय स्पर्धेत गुळुंचवाडी शाळेचे निर्विवाद वर्चस्व
1 min readबेल्हे दि.८:- पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती जुन्नर वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सव सन 2023 अंतर्गत आणे केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळुंचवाडी (ता.जुन्नर) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
या स्पर्धेत अनेक केंद्रातील अकरा शाळातील सुमारे 250 स्पर्धकांनी व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांनी विविध बारा प्रकारच्या कला-क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतला. अतिशय आल्हाददायक व उत्साहवर्धक वातावरणात या क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमासाठी गुळुंचवाडी गावचे नवनिर्वाचित उपसरपंच शांताराम गुंजाळ , ग्रामपंचायत सदस्य विजय गुंजाळ,
बबन काळे, स्वाती घोडके, ऋतिका भांबेरे, वैशाली भांबेरे, संजीवनी गायकवाड व गावातील विठ्ठल गुंजाळ, दगडूभाऊ काळे, दत्तात्रय गुंजाळ, दत्तात्रय भांबेरे, सुधाकर सैद, जिजाभाऊ काळे, संतोष देवकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगनाथ भांबेरे, उपाध्यक्ष चंचल गुंजाळ, सदस्य प्रीती शिंदे, सुषमा भांबेरे, दिलीप जाधव, शांताराम भांबेरे, पोपट काळे, शोभा गुंजाळ, वर्षा गुंजाळ,
विठ्ठल खिलारी, भाऊसाहेब काळे, किसन मधे, रामचंद्र जाधव, रेवणनाथ गुंजाळ, शांताराम खिलारी, लक्ष्मण गुंजाळ, नरेश भांबेरे, लता गुंजाळ, उषा शिंदे, सुरेखा गुंजाळ, रोहन घोडके, आणे केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी शिक्षक तसेच गावातील ग्रामस्थ व महिला, तरुण मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आणे केंद्राच्या केंद्रप्रमुख सविता कुऱ्हाडे यांनी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामागचा हेतू व महत्त्व आपल्या प्रास्ताविकेतून मांडले व क्रीडा स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडण्याचे आवाहन केले.यावेळी ग्रामपंचायत गुळुंचवाडीचे नवनियुक्त उपसरपंच व सर्व सदस्यांचा शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती झालेले उत्कृष्ट वार्ताहार सुधाकर सैद यांचाही सन्मान करण्यात आला.
दगडूभाऊ काळे, विठ्ठल गुंजाळ, वर्षा गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य संजीवनी गायकवाड व कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच शांताराम गुंजाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांनी खो-खो, कबड्डी, लोकनृत्य, भजन, लेझीम या सामूहिक प्रकारात तसेच 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, लांब उडी उंच उडी, थाळीफेक, गोळा फेक, वकृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा इत्यादी वैयक्तिक प्रकारांमध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट प्रदर्शन केले.
शाळा व्यवस्थापन समिती गुळुंचवाडीचे अध्यक्ष रंगनाथ भांबेरे, उपाध्यक्षा चंचल गुंजाळ, सदस्य पोपट काळे, भाऊसाहेब काळे यांनी सर्व स्पर्धकांसाठी गोड जेवणाची व्यवस्था केली. माजी सरपंच वैशाली गुंजाळ यांच्या वतीने स्पर्धकांसाठी प्रशस्तिपत्रकांची व्यवस्था करण्यात आली. तर व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्षा कौशल्या फापाळे यांनी स्पर्धकांसाठी पाण्याची व्यवस्था केली.
गुळुंचवाडी शाळेतील स्पर्धकांनी विविध प्रकारांमध्ये उत्तम खेळाचे प्रदर्शन करून केंद्रस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर नळवणे शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला. आणे, पेमदरा, भोसलेवाडी, आनंदवाडी, गणेशनगर, शिंदेवाडी, नवलेवाडी, सुरकुलवाडी, व्हरुंडी या शाळेतील स्पर्धकांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. केंद्रातील सर्व शिक्षकांनी पंच, गुणलेखक म्हणून काम पाहिले.
सर्व विजयी स्पर्धकांचे अभिनंदन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व बीट स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुळुंचवाडी शाळेला नेहमी सहकार्य करणारे, गुळुंचवाडी गावचे भूषण, सामाजिक बांधिलकी जपणारे,
उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते श्री. जालिंदर जी देवकर साहेब यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून केंद्रस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस देण्याचे जाहीर केले.
शाळेच्या व व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांचे आभार मानन्यात आले. गुळुंचवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक अशोक बांगर, सरिता मटाले, ज्योती फापाळे, नुरजहाँ पटेल, ज्ञानेश्वर जाधव, सुभाष दाते, रामदास संभेराव, भाऊसाहेब खोसे, विजय चव्हाण, महेश साबळे, सुनिल मधे यांनी स्पर्धेचे उत्तम प्रकारे नियोजन व आयोजन केले.
अशाप्रकारे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा अतिशय उत्साही, आनंदी व निकोप वातावरणात पार पडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुळुंचवाडी शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी केले.अशोक बांगर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर आनंदवाडी शाळेचे भाऊसाहेब खोसे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.