पारगाव तर्फे आळे येथे श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी निमित्ताने सप्ताह 

1 min read

पारगाव तर्फे आळे दि.७:- स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) येथे श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी निमित्ताने दिनांक २९ नोहेंबर रोजी सप्ताहाची सुरुवात होऊन ६ डिसेंबर रोजी ह.भ.प.पोपट महाराज पाटील (कासारखेडे) यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.

सप्ताहात ह.भ.प.नंदकिशोर महाराज सोनवणे, ह.भ.प. शंकर महाराज मोरे, ह.भ.प.गणेश महाराज फरताळे, ह.भ.प प्रकाश महाराज जंजिरे, ह.भ.प.मधुकर महाराज मोगल, ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली) यांची किर्तन सेवा झाली.

या कार्यक्रमानिमित्ताने अखंड विणा पहाटे ४ ते ६ काकडा, दुपारी ३ ते ५ नियमाचे भजन, सायंकाळी ४.३० ते ५.३० हरिपाठ, रात्री ६ ते ८ श्रीहरिकीर्तन व ९ ते ११ रात्री जागर झाला.

हे वर्ष सप्ताहाचे ४८ वर्ष असल्याने दोन वर्षांनी सुवर्ण मोहत्सव होणार असल्याचे पंचायत समिती माजी सभापती शिवाजीराव चव्हाण यांनी सांगितले व सप्ताहाला सहकार्य करणा-या सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे