हाडे निरोगी ठेवण्यासाठी च्या काही आरोग्य टिप्स

1 min read

जुन्नर दि. ६:- आपल्या वयानुसार हाडे कमकुवत होणे ही नैसर्गिक बाब असली तरी काही मार्गांनी आपण ही समस्या नक्कीच कमी करू शकतो. आपण कोणत्या मार्गांनी आपली हाडे निरोगी आणि मजबूत ठेवू शकता ते जाणून घेऊयात.

व्हिटॅमिन- डी

याच्या कमतरतेमुळे शरीर कॅल्शियम वापरू शकत नाही आणि हाडे कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे आपल्या आहारात व्हिटॅमिन डी समृद्ध अन्नपदार्थ जसे की, मशरूम, अंडी, फॅटी फिश, दूध इत्यादींचा समावेश करा. याशिवाय सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशातूनही तुम्ही व्हिटॅमिन डी मिळवू शकता. मात्र, जास्त वेळ उन्हात राहू नका.

 कॅल्शियम

कॅल्शियम हाडांच्या मजबुतीसाठी खूप महत्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे कॅल्शियमयुक्त पदार्थ जसे की सोया उत्पादने, दूध, चीज, बदाम, तीळ इत्यादींना आहाराचा भाग बनवा.

नियमित व्यायाम करा

विशिष्ट प्रकारचे व्यायाम केल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. हाडांची घनता कमी होण्यापासून रोखण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे फायदेशीर ठरते आणि नवीन हाडे तयार होण्यासही मदत होते. त्यामुळे वेट ट्रेनर हा तुमच्या व्यायामाचा भाग बनवा.

 वजन नियंत्रित ठेवा

जास्त वजनामुळे हाडांवर जास्त ताण येतो, ज्यामुळे ते कमकुवत होऊ शकतात. त्याचप्रमाणे वजन कमी झाल्यामुळे हाडांची घनता कमी होऊन ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. त्यामुळे निरोगी वजन असणे महत्त्वाचे आहे. यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे