हिवाळ्यात तीळ गुळ सेवन करण्याचे भरमसाठ फायदे
1 min readजुन्नर दि.३:- हिवाळ्यात तीळ गुळ सेवन करण्याचे शरिसाठी भरमसाठ फायदे आहेत. एनर्जी बूस्ट:- गूळामध्ये कर्बोदके अधिक प्रमाणात असते. ज्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढवण्यास मदत होते. तीळ हे प्रथिने समृद्ध असतात. ज्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते. हिवाळ्यात याचे सेवन केल्याने शरीराला उष्णता मिळेल.
आरोग्यासाठी फायदेशीर:- तीळ आणि गूळाचे सेवन दातांच्या बळकटीसाठी फायदेशीर आहे. याशिवाय केसांची वाढ चांगल्या प्रमाणात होते. मूत्राशयाचा त्रास असणाऱ्यांनी तीळ, दूध आणि गूळ मिसळून प्यायल्याने हा आजार कमी होतो.
पोषक तत्वांनी समृद्ध :- तीळ हे कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्त यासह आवश्यक पोषक तत्वांचा चांगला स्त्रोत आहे. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.
रक्तातील साखरेची पातळी :- गुळात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामुळे साखरेची पातळी हळूहळू वाढते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी गूळ फायदेशीर आहे.