नारायणगावात कोरोनाचे ४ रुग्ण; तालुका आरोग्य विभाग सतर्क 

1 min read

नारायणगाव दि.५: नारायणगाव (ता. जुन्नर) येथील एकास बुधवार (दि. ३) कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले. तसेच आज शुक्रवार दि.५ रोजी ३ रुग्ण रुग्ण करोना बाधित झाले आहेत. जुन्नर तालुक्यातील रुग्ण संख्या ४ झाली आहे.

त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी केले. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी कोविडच्या नियमांचे पालन करणे, तसेच काळजी घेणे आवश्यक आहे.

जोखमीच्या रुग्णांनी अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन डॉ. गुंजाळ यांनी केले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या थंडीमुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

गरज वाटल्यास या रुग्णांची कोरोनाची तपासणी केली जात आहे. तपासणीत १५ हून अधिक चाचण्या नाकारात्मक आल्या आहेत. सर्दी- खोकला झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत.

गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टनसिंग पाळावे, सॅनिटायझरचा वापर करावा, आदी सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे