श्री हॉस्पिटल आळेफाटा येथे सोमवारी मोफत भव्य हृदयरोग व मूत्ररोग शिबीर 

1 min read

आळेफाटा दि.२५ :- आळेफाटा (ता. जुन्नर) येथील श्री हॉस्पिटल व रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल आयोजित सोमवार दि.२७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत मोफत भव्य हृदयरोग व मूत्ररोग शिबिराचे आयोजन केले आहे.

या शिबिरात मणक्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे मुतखड्याच्या शस्त्रक्रिया, प्रोस्टेट ग्रंथीच्या शस्त्रक्रिया, फ्रॅक्चर, सांधे व हाडांच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. तसेच ऍन्जिओग्राफी केल्यानंतर ब्लॉकेज अढळल्यास एन्जोओप्लास्टी महात्मा ज्योतिराव फुले व जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत केली जाईल.

हृदय तज्ञांकडून तपासणी कोणी करून का घ्यावी?

छातीत दुखणे, जुने हृदय विकार, धाप लागणे / दम लागणे, सुज येणे, छाती धडधडने, रूटीन चेक-अप,थकवा येणे, चक्कर येणे अशा रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घेऊन तपासणी करून घ्यावी.

या शिबिरात इ.सी.जी, हृदयरोग तज्ञांचा सल्ला,ब्लड शुगर, बीपी तपासणी मोफत केली जाणार आहे तसेच इतर लॅब तपासणीत ३० टक्के सूट मिळणार आहेत. स्थळ – श्री हॉस्पिटल, नाशिक – पुणे रोड आळेफाटा ता.जुन्नर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे