दिवाळीत आरोग्य जपण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा
1 min readजुन्नर दि.११:- अति खाणे टाळा :- दिवाळीत आहारात चविष्ट फराळाबरोबर गोड पदार्थांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश होतो. . या आनंदोत्सवात नकळत अति खाणे होते. त्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. पित्त विकारात वाढ होउ शकते. घराबाहेरचे खाणे आणि अति खाण्यामुळे पोट बिघडते. त्यामुळे दिवाळीत अति खाणे टाळा. तसेच आहारात पालेभाज्या व फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
पुरेशी झोप घ्या :- दिवाळीनिमित्त सर्वजण एकत्र येतात. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागरण होते. मात्र पुरेशी विश्रांती घेतली नाही तर याचा आरोग्यावर परिणाम होतो. अपुर्या झोपेमुळे तुमचा मूडही बदलू शकतो. त्यामुळे पुरेशी विश्रांती घेणे याला प्राधान्य द्या. चांगला मूड आणि आरोग्यासाठी 6-8 तास झोप आवश्यक घ्या.
महिलांनी अतिश्रम टाळावे :दिवाळीत महिलांची धावपळ वाढते. त्यामुळे अचानक शारीरिक हालचाली वाढतात. तसेच अति तळलेले पदार्थही खाण्यामध्ये येतात. याचा परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे दिवाळीत महिलांनी अतिश्रम टाळावे. अतिश्रम टाळण्याबरोबरच स्वतःला हायड्रेटेड ठेवत सर्वांनीच पुरेसे पाणी पिणे हितकारक ठरते.
वायू प्रदूषण करु नका :दिवाळीमध्ये फटाके आणि मोठ्या आवाजातील संगीतामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढते. त्यामुळे अति आवाजाचे फटाके आणि संगीताचा दणदणाट कमी करा आणि दिवाळी आरोग्यदायी करा.