मातोश्री आयुर्वेद कॉलेजमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
1 min readकर्जुले हर्या दि.१९:- आयुर्वेद जनजागृती अभियान अंतर्गत मातोश्री आयुर्वेद कॉलेज कर्जुले हर्या (ता.पारनेर) च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात हरेश्र्वर विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्जुले हर्या या ठिकाणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यात डॉ. संतोष घाने, डॉ. स्वाती पठारे व रश्मी काळुखे या टीम प्रमुख होते. तसेच आयुर्वेद कॉलेज विद्यार्थी त्यात सहभागी झाले होते. तसेच टीम 2 डॉ. मोनिका मदने, डॉ दिशा माने व डॉ. धर्यशिल केवाल या टीम ने मातोश्री सायन्स कॉलेज व मातोश्री ग्लोबल स्कूल या विद्यार्थांची आरोग्य तपासणी केली. त्यात प्रामुख्याने जे मुले आजारी आहेत त्यांना मोफत औषध उपचार करण्यात आले. तसेच या कार्यक्रमांतर्गत नवरात्री निमित्त आळेफाटा येथील राजस्थान मित्र मंडळ नवरात्र उत्सवात डॉ.घाणे संतोष यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.यावेळी महिला आजार व त्यांची काळजी यावर अतिशय सुंदर मार्गदर्शन केले. मंडळाचे वतीने डॉ.घाणे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात आयुर्वेद महावि्द्यालयातर्फे किरण आहेर, सचिव डॉ दीपक आहेर, डॉ. श्वेतांबरी आहेर, शीतल आहेर, प्राचार्या डॉ.धनश्री होळकर, यशवंत फापाळे, सासवडे सर, डॉ रश्मी काळुखे, डॉ माधव बोरुडे यांचे सहकार्य लाभले.