महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ जुन्नर तालुका अध्यक्षपदी सुधाकर सैद यांची पुनःश्च नियुक्ती
1 min readआळेफाटा दि.४:- महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या जुन्नर तालुकाध्यक्षपदी सुधाकर सैद यांची फेरनिवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी मंदार अहिनवे आणि विजय बोंबले, सचिवपदी किशोर वारुळे यांची तर कार्याध्यक्षपदी मनिष गडगे यांची निवड करण्यात आली आहे.
रविवारी (दि. ३) नारायणगाव (ता. जुन्नर) येथे झालेल्या बैठकीत जुन्नर तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे मार्गदर्शक संदीप खळे, राज्याध्यक्ष डॉ. समीर राजे, समर्थ भारत माध्यम समूहाच्या संपादिका स्नेहा बारवे, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र वायकर, जेष्ठ पत्रकार सचिन भोर,
माजी कार्याध्यक्ष बाबाजी टाकळकर, महेश घोलप, दुष्यंत बनकर, मनोहर हिंगणे, सुदर्शन मंडले आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे राज्यभरात तब्बल ८५०० पेक्षा जास्त सदस्य असून जुन्नर तालुक्यातही मोठे संघटन आहे. पत्रकार बांधवांच्या हक्क, अधिकार, प्रशिक्षण आणि हितसंवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ राज्यभरात कार्यरत आहे.
यावेळी झालेल्या बैठकीत संदीप खळे यांनी पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले तर राज्याध्यक्ष यांनी पत्रकार महासंघाच्या धोरणांवर प्रकाश टाकला. या बैठकीचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुधाकर सैद यांनी केले तर जेष्ठ पत्रकार सचिन भोर यांनी आभार मानले. पत्रकारांनी बातमी देताना विशेष काळजी घेऊन निष्पक्षपणे काम करने आवश्यक आहे. पत्रकारिता ही एक मोठी जबाबदारी आहे. समाजाचा घट करू पाहणाऱ्या अपप्रवृत्तींना थोपविण्याचे सामर्थ्य असणारी लेखणी ही सदैव समाजहितासाठी झिजली पाहिजे तरच लोकशाही अबाधित राहील.असे संदीप खळे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ यांनी या वेळी सांगितले.
तर महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या जुन्नर तालुक्यातील नूतन पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. मला पुन्हा एकदा सर्वांनी अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली त्या बद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आभार सुधाकर सैद, यांनी मानले. जुन्नर तालुक्यातील तब्बल 35 पत्रकार बांधवांनी एकत्र येऊन तालुक्यात महाराष्ट्र टाज्य पत्रकार महासंघाची एक सकारात्मक प्रतिमा निर्माण केली आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या जुन्नर तालुका कार्यकारिणी आणि सर्व सदस्यांना पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा. राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ डॉ. समीर राजे यांनी सांगितले. संघात अध्यक्ष : सुधाकर सैद, सचिव: किशोर वारुळे, उपाध्यक्ष: विजय बोंबले, उपाध्यक्ष: मंदार अहिनवे कार्याध्यक्ष: मनिष गडगे कोषाध्यक्ष: अध्यक्षांकडे कार्यभार संपर्क प्रमुख : सुनिकेत बटवाल प्रसिध्दी प्रमुखः रामकृष्ण भागवत, सह सचिव: केतन ताम्हाणे, कायदेशीर सल्लागार: अॅड. गौरव रोकडे यांची निवड झाली.