बिबट सफारीसाठी जुन्नर तालुक्याला १२० कोटी रुपयांचा निधी मंजूर:- आमदार अतुल बेनके

1 min read

जुन्नर दि.२:- जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट सफारी उभारण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८० कोटी रुपयांचा, तसेच जुन्नर येथे तहसील, भूमापन, पोलीस स्टेशन व इतर शासकीय कार्यालयाची सुसज्ज इमारत उभारण्यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या या विकास कामांना गती येणार आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या माध्यमातून शुक्रवारी जुन्नर तालुक्याच्या विकास कामासाठी निधीच्या माध्यमातून १२० कोटी रुपयांची भेट दिली आहे.अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट सफारी उभारण्याचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आल्या नंतर बिबट सफारी निधीच्या प्रतीक्षेत होती. निधीसाठी माझा पाठपुरावा सुरू होता.

 उपमुख्यमंत्री पवार यांनी बिबट सफारीसाठी 80 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने पुढील काळात या कामाला गती येणार आहे. जुन्नर येथील महसूल, पोलीस स्टेशन व इतर शासकीय कार्यालया साठी पुरेशी जागा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती.

धान्य गोडावूनच्या जागेत शासकीय कार्यालयाची इमारत उभारणीसाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.”

अतुल बेनके, आमदार जुन्नर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे