बिबट्याच्या हल्ल्यात ५ शेळ्या ठार, एक जखमी

1 min read
बोतार्डे दि.२८:- (प्रतिनिधी- प्रा.सतिश शिंदे): जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील बोतार्डे (पो. खानगाव ता. जुन्नर) येथील केशव दिगांबर गाडेकर यांच्या ५ शेळ्यांवर गोठ्यात शिरून बिबट्याने हल्ला केला. यामध्ये ५ शेळ्या जागीच ठार झाल्या तर एक जखमी झाली आहे.

हि घटना रात्री २ च्या सुमारास घडली असल्याची माहिती गाडेकर यांनी दिली.

वास्तविक वनखाते जुन्नर यांनी तालुक्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशा प्रकारच्या मागण्या या अगोदरदेखील झाल्या आहेत.

मात्र या गोष्टीची दखल वनखाते घेताना दिसत नसल्याचेच बोतार्डे येथील झालेल्या घटनेवरून दिसत आहे. गाडेकर यांनी सांगितले की, ही संपूर्ण भरपाई वनखात्याने द्यावी असे त्यांनी बोलताना सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे