जेष्ठ साहित्यिक प्रा. रसूल सोलापूरे बहुद्देशीय संस्था महागाव चा राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार सरिता म्हेत्रे कलढोणे यांच्या ‘शब्दांच्या गाभाऱ्यात ‘ला जाहीर

1 min read

पुणे दि.२४:- जेष्ठ साहित्यिक प्रा. रसूल सोलापूरे बहुद्देशीय संस्था महागाव ता .गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर या संस्थचे वतीने देण्यात येणारे साहित्यिक पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. कवयित्री सरिता म्हेत्रे कलढोणे यांच्या शब्दांच्या गाभाऱ्यात काव्यसंग्रहाला उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला.

शब्दांच्या गाभाऱ्यात हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह आहे.साहित्य क्षेत्रात एक उत्तम कवयित्री लेखिका, गझलकार, म्हणून त्याची ख्याती आहे. महाराष्ट्रातील विविध साहित्यिक समूहातून, दैनिकातून , मासिकातून सातत्याने त्या लेखन करत असतात.

आतापर्यंत विविध साहित्यिक स्पर्धातून त्यांनी यश संपादन केले आहे.एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत.आगामी काळात कथा संग्रह ,गझल संग्रह करण्याचा त्यांचा मानस आहे. सरिता म्हेत्रे कलढोणे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे