आणे पठारावरील आंदोलन अधिक तीव्र; आमरण उपोषणाला सुरुवात

1 min read

आणे दि.२३:- आणे (ता.जुन्नर) पठारावरील आनंदवाडी, आणे, नळवणे शिंदेवाडी पेमदरा या गावांचा कुकडी प्रकल्पात समावेश करून उपसासिंचन योजना रावबावी या मागणीकरिता आज गुरुवार दिनांक २३ नोहें २०२३ पासून पठार विकास संस्था आणे चे कार्याध्यक्ष मधुकर दाते व संचालक मुक्ता भाऊ दाते यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

या आंदोलनास शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा संघटक अंबादास हांडे यांनी पाठिंबा जाहीर करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.जर पठार भागावरील आंदोलकांना जलसंपदा खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर शेतकरी संघटनेच्या वतीने कुकडीचे आवर्तनाचे थेंबभर सुद्धा पाणी धरणातून खाली जाऊ दिले जाणार नाही, प्रसंगी आम्ही शेतकरी कॅनॉलमध्ये आंदोलन करू असा इशारा अंबादास हांडे यांनी दिला.

त्यांच्या समवेत प्रमोद खांडगे तसेच भारतीय किसान संघाचे जुन्नर तालुकाध्यक्ष बाळासाहेब दाते आंदोलनस्थळी उपस्थित होते. या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रियंका शेळके संचालिका कृषि उत्पन्न बाजार समिती जुन्नर, अजित शिंदे सरपंच शिंदेवाडी, अर्चना उबाळे सरपंच नळवणे, प्रियंका दाते सरपंच आणे, जयश्री गाडेकर सरपंच पेमदरा, माजी सरपंच एम.डी.पाटील शिंदे, योगेश आहेर,

शांताराम दाते,प्रकाश ताजवे, पांडुशेठ गाडेकर, पाटीलबुवा गाडेकर,रंगनाथ बेलकर, अरुणा दाते,रंगनाथ आहेर,किशोर आहेर,सुहास आहेर, खंडुशेठ बेलकर,लक्ष्मण शिंदे, विठ्ठल बेलकर, आनंदा बेलकर सामाजिक कार्यकर्ते बाबाजी शिंदे, अनिल आहेर, प्रशांत दाते, सुनिल दाते, बाबाजी आहेर, बाबुराव दाते, प्रकाश दाते, गोरख शिंदे, कान्हु हांडे, गणेश देशमुख, भरत पंडीत, संभाजी आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.

आंदोलकांच्या वतीने पठार विकास संस्थेचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी जाहीर पाठिंबा दिलेल्या व्यक्ती व संस्थांचे आभार मानले.

शेतकऱ्यांनी गुरुवार दि.१६ पासून आंदोलन सुरू केले आहे. दि. १६ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर पर्यंत धरणे आंदोलन, २० नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर पर्यंत साखळी उपोषण करण्यात आले. एवढ्यावर शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने गुरुवार दि. २३ नोव्हेंबर पासून मागणी पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण करण्यात येणार आहे.”

विराज शिंदे , पठार विकास संस्थेचे सचिव ,आणे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे