आळे येथे चौथा बिबट्या जेरबंद
1 min readआळे . २०:- आळे या ठिकाणी वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आळे (ता.जुन्नर) या गावातील तितर मळयात दि.९ ऑक्टोबर रोजी बिबटयाने ४ वर्षीय बालकावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडल्याने वन विभागाने या ठिकाणी १६ पिंजरे लावले होते.
या पिंजऱ्यात मंगळवार दि.१० ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास एक बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले होते तर दुसरा बिबट्या रविवार दि.१४ ऑक्टोंबर च्या रात्री पुन्हा दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात आला.
तर तिसरा बिबट्या ४ नोव्हेंबर रोजी पिज-यात अडकला होता. व याच मळ्यातील दिपक भानुदास लोंढे या शेतक-याच्या शेतावर लावलेल्या पिंज-यात सोमवारी दि.२० रोजी पहाटेच्या सुमारास खाद्याच्या शोधात आलेला असताना हा बिबट्या जेरबंद झाला आहे.
सदर बिबट्या हा मादी जातीचा असुन दोन वर्षाची आहे तिला माणिक डोह येथील बिबट निवारण केंद्रात हलवण्यात आले असल्याची माहिती वन अधिकारी संतोष साळुंखे, के.जी.भालेराव यांणी दिली.