साप्ताहिक उद्याचा शिलेदार प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

1 min read

बोतार्डे दि.८: जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील बोतार्डे गावातील प्रा.सतिश संतोष शिंदे यांच्या साप्ताहिक उद्याचा शिलेदार या साप्ताहिकाचा प्रथम वर्धापन दिन मंगळवार दिनांक ५ रोजी मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमप्रसंगी सकाळी ११ वाजता कार्यक्रम‍ाचे उद्घाटन व महापुरूषांच्या प्रतिमांचे पूजन व दिप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना साप्ताहिक उद्याचा शिलेदारचे मुख्य संपादक प्रा.सतिश संतोष शिंदे यांनी मनोगतामधून मांडत आजपर्यंतचा साप्ताहिकाचा खडतर प्रवास व अनुभव व २२ अंक कशाप्रकारे वर्षभरात काढले.

व पुढील वाटचाल कशाप्रकारे असेल तसेच शुभेच्छा त्यांनी यावेळी देत आलेल्या सर्व मान्यवर व कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन मरभळ यांचे ऋण व्यक्त केले. यानंतर प्रतिभा भिकाजी किर्तीकर्वे संपादिका यांनी आपले मनोगत व्यक्त करून साप्ताहिक उद्याचा शिलेदारची पार्श्वभूमी सांगून त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,

डॉ.खंडू माळवे (ज्येष्ठ साहित्यिक ) यांनी साप्ताहिक उद्याचा शिलेदारला शुभेच्छा देत असताना म्हणाले की, सतिश शिंदे यांनी अतिशय ग्रामीण भागात हे साप्ताहिक सुरू केले असून एक ऐतिहासिक नांदी भविष्यकाळासाठी असणार व त्यांना राज्यशासन व देशपातळीवरील मदतीसाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले,

पोपट राक्षे (RPI अध्यक्ष जुन्नर तालुका) म्हणाले की साप्ताहिक उद्याचा शिलेदार व त्याचे संपादक सतिश शिंदे प्रतिभा किर्तीकर्वे व प्रशांत धोत्रे आयोजक यांना शुभेच्छा देत असताना साप्ताहिक उद्याचा शिलेदार या साप्ताहिकाला खरोखर जुन्नर तालुका व राज्य पातळीवर पोहोचवण्याचं काम यापुढे आपण करून पुढचा द्वितीय वर्धापन दिन हा

जुन्नर तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना अगोदर आपण साजरा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले, संभाजी साळवे जेष्ठ समाजसेवक यांनी साप्ताहिक उद्याचा शिलेदार व आयोजकांना शुभेच्छा दिल्या व या पत्रकाला खरोखर मदतीची गरज असून भविष्यकाळासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया असे त्यांनी सांगितले.

नंदिनी ताई सुकाळे मॅडम यांनी साप्ताहिक उद्याचा शिलेदार साप्ताहिक व आयोजकांना भविष्यकाळासाठी शुभेच्छा देऊन चांगली वाटचाल व्हावी अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच प्रशांत धोत्रे यांनी देखील आपले मनोगत मांडत असताना उद्याचा शिलेदार या साप्ताहिकाला जी काही मदत लागेल ती आपण सर्वजण मिळून भविष्यात करूया असा मानस त्यांनी यावेळी बोलताना केला,

त्याचप्रमाणे पोपटराव वाघमारे माजी ए. एस. आय. पुणे ग्रामीण व डॉ.विशाल आमले यांनीदेखील साप्ताहिक उद्याचा शिलेदारला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या व जी काही मदत लागेल ती आपण करण्यासाठी तयार आहोत असे त्यांनी बोलताना सांगितले, नारायणजी पवार पोलीस निरिक्षक जुन्नर यांनी कार्यक्रमप्रसंगी भेट देऊन साप्ताहिक उद्याचा शिलेदार व आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

व साप्ताहिकाचे दैनिक व्हावे तसेच आपली उत्तरोत्तर प्रगती होवो व आपल्या हातची लेखणी धारदार व्हावी अशाप्रकारच्या शुभेच्छा दिल्या यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन मरभळ क्रृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जुन्नर व विद्यमान ग्रा.पं.सदस्य यांनी साप्ताहिक उद्याचा शिलेदार या साप्ताहिकाला शुभेच्छा दिल्या व आपण अशीच प्रगती करावी अशी मनोमन इच्छा व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी ट्रॉफी सौजन्य अर्जुन जाधव, लाईफ फाऊंडेशन अध्यक्ष यांनी केले तर स्नेहभोजन जनार्दन मरभळ क्रृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांनी सहकार्य केले या सर्वांचे आयोजकांनी आभार मानले.

सर्व सन्मानार्थी व उपस्थित मान्यवरांचे ट्रॉफी, सन्मानपत्र व गुलाबपुष्प व पुस्तक देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे निवेदन सुनिल खरात व आभार बाळू खरात यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे