बेल्ह्यात तुफान दगडफेक व हाणामारी; दोन गटात एकमेकांना विरोधात गुन्हा दाखल 

1 min read

बेल्हे दि.१:- बेल्ह्या (ता.जुन्नर) येथे दोन गटात तुफान दगडफेक करत मारामारी झाली. ही घटना बेल्हे गावात गुरुवारी (दि.३०) रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही गटाच्या तरूणांनी एकमेकांच्या विरोधात आळेफाटा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडगुजर यांच्याकडून समजलेली माहिती अशी, जेवण करून मंदिरात बसण्यासाठी जात असलेल्या २८ वर्षीय तरुणावर सुमारे ३० जणांच्या जमावाने लोखंडी रॉड तसेच लाकडी दांडक्याने डोक्यास व पाठीवर जबरी मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली.

याबाबत अंकित ज्ञानेश्वर शिरतर (रा. श्रीराम चौक, बेल्हे, ता.जुन्नर जि. पुणे) याने दिलेल्या फिर्यादीवरून हुसेन बेपारी, मिराज नजीर बेपारी, पापा कुरेशी, अकिब नासीर बेपारी, सदाम कुरेशी, समिर कुरेशी, शाकीर बशीर बेपारी, अनसअली शराफत अली, जाकीर बेपारी, इम्रान कुरेशी व इतर १५ ते २० जण (सर्व रा. बेल्हे,ता.जुन्नर,जि.पुणे)

यांच्याविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आकिब नासिर बेपारी, मिराज नजीर बेपारी, समीर कादर बेपारी यांना अटक केली आहे.

दुसरी फिर्याद हुसेन नजीर बेपारी (वय-१७ वर्षे,रा. चांदणी चौक, बेल्हे ता. जुन्नर जि. पुणे) याने दिली असून त्याचे चुलते समीर कादर बेपारी हे दुचाकीवरून जात असताना गावातील फिरोज इनामदार व अनुष डावखर यांनी त्यांना कट का मारला असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली.

या झालेल्या वादातून हुसेन बेपारी व घरातील सदस्यांना ३१ जणांनी लाठ्या व दगडांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत लोल्या उर्फ रियाज फिरोज इनामदार, अनुज डावखर, अंकेत शिरतर,सागर ज्ञानेश्वर शिरतर, गणेश मसू गफले, प्रशांत जालिंदर बंडलकर, निलेश रामदास शिरतर, दर्शन दिलीप शेरकर, स्वप्निल बन्सी बोराडे, विपुल दिलीप शिरतर, किरण गंगाराम मंडले,

सुरज लक्ष्मण शिरतर , बाबू उर्फ प्रशांत धनवटे, अथर्व संजय भुजबळ, मन्या उर्फ विकास भुजबळ, चक्क्या उर्फ विकास शिरतर व इतर १० ते १५ जण (सर्व रा.बेल्हे, ता.जुन्नर, जि, पुणे) यांच्याविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी प्रशांत जालिंदर भंडलकर, आकाश उर्फ सागर ज्ञानेश्वर शिरतर, गणेश मसु गफले यांना अटक केली असून इतरांचा शोध घेणे कामी पोलीस पथके रवाना केली आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे