नारायणगावात एटीएसची मोठी कारवाई; दहा बांग्लादेशी नागरिकांना घेतल ताब्यात
नारायणगाव दि.१५: – पुणे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुणे जिल्ह्यातील नारायणगावात दहा बांग्लादेशी नागरिकांना पकडले.
गुरूवार दि.१४ रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी, बांग्लादेशी नागरिकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायणगावात बांग्लादेशी नागरिक बेकायदा वास्तव्यास करत असल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली होती.
त्यानुसार गुरुवारी सकाळी त्यांनी नारायणगावात धाडसत्र सुरु केले. त्यांना आठ बांग्लादेशी नागरिक मिळून आले. हे सर्व नागरिक भारतात बेकायदा वास्तव्य करत असल्याचे आढळून आले.
दरम्यान, पाच दिवसापुर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त कारवाई करत पुणे, ठाणे परिसरात आयसीस मॉड्युलच्या संदर्भात कारवाई करत पंधरा जणांना ताब्यात घेतले होते.
तर कोंढव्यातील दोघांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता एटीएसने बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांच्या विरुद्ध मोहीम हाती घेतल्याचे दिसून येते.