सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी आतवण टायगर पॉईंट येथील वेळेचे निर्बंध न पाळणारे ४ व्यवसायीक व गोंधळ करणारे १४ पर्यटकांवर केली कारवाई
1 min read
लोणावळा दि.१९:- लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी स्वतः पथकासह लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे हद्दीमधील मौज़े आतवण (ता. मावळ जि. पुणे) गावचे हृद्दीधील टायगर पॉईंट या पर्यटन स्थळावर दि. १९/११/२०२३ रोजी ०१:०० वा. चे
सुमारास वेळेचे निर्बंध न पाळता ४ टपरी व्यवसायीकांनी आपला व्यवसाय चालू ठेवलेल्या स्थितीमध्ये मिळून आलेने त्यांचेविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३ (डब्ल्यू) अंतर्गत तसेच सदर ठिकाणी पर्यटनाकरीता आलेले १४ पर्यटक गोंधळ करून शांतता भंग करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदयातर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या पूर्वी याच ठिकाणी अशाप्रकारे कारवाई करण्यात आली असून यापुढेही सदर ठिकाणी व्यवसाय करणारे व्यवसायीकांनी वेळेचे निर्बंध पाळून सकाळी ०६:०० वा. पासून ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत आपला व्यवसाय करावा.
पर्यटनाकरीता आलेल्या पर्यटकांनी कोणत्याही प्रकारे गोंधळ गोंगाट करून सार्वजनीक शांतता भंग करु नये व कोणीही दारुचे सेवण करून वाहन चालवू नये असे लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी आवाहन केले आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक आणि त्यांच्या पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन रछळ, अंकुश नायकुडे, आशा कवठेकर, अंकुश पवार, सुभाष शिंदे, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सागर अरगडे, नितीन कदम,
केतन तळपे, राहुल खैरे, नागेश कमठणकर, लोणावळा शहर पोलीस स्टेशन उपनिरीक्षक लतीफ मुजावर, भुषण कुवर, कामशेत पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शुभम चव्हाण, अमोल ननवरे, वडगांव मावळ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक रुतुजा मोहिते, सचिन गायकवाड, चेतन कुंभार यांनी केली आहे.