दिघोळ देवीचे मधील संत सावता महाराज मंदिरात एक महिना काकडा चालू
1 min read
सोनपेठ दि.१९:- सोनपेठ तालुक्यातील दिघोळ (जि.परभणी) देवीचे येथील संत सावता महाराज मंदिर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू होणारा काकडा हा एक महिना चालू असतो.
या सकाळी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी नाष्ट्याची सोय केलेली आहे. रोज त्यांना वारकरी संप्रदायांना व श्रद्धमंडळींना सकाळी चार वाजल्यापासून काकडा सुरू होतो ते सकाळी सहा वाजेपर्यंत त्यानंतर आरती होते व आरती झाल्याच्या नंतर सर्वांना महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे.
या नियोजनामध्ये माळी समाजातील सर्व सतत तीस दिवस रोज पंगत वाटून घेत आहेत त्या ठिकाणी रोज तीस दिवस वाह प्रसादाचा कार्यक्रम होतो आहे. या कार्यक्रमाचे आयोजन अंगद महाराज शिंगाडे गायक पखवाद वादक बाबुराव पेटी वादक बालासाहेब दिवाण,
शिंगाडे नामदेव शिंगाडे युवा नेते नागनाथ दादा शिंगाडे वैजनाथ अण्णा शिंगाडे सरपंच भागवत शिंगाडे नवनाथ यादव श्याम काथवटे काकडा सांगता यानिमित्त दिनांक 27 सोमवारी रात्री 8 ते 10 ह भ प आपल्या गावचे भूषण श्री ह भ प खंडू महाराज भंडारे यांचे किर्तन होईल.
तसेच ह्या कीर्तनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जगदीश महाराज सोनवणे टोकवाडीकर व कीर्तनाचा सर्व गावकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती करण्यात आली आहे.