पारनेर तालुकास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

1 min read

पारनेर दि.१३:- स्नेहबंध ग्रामविकास प्रतिष्ठान धोत्रे बुद्रुक (ता.पारनेर) यांच्या वतीने एक गाव एक संघ या नियमाप्रमाणे मंगळवार दि.१४ नोव्हेंबर २०२३ ते रविवार दि.१९ नोव्हेंबर २०२३ तालुकास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.

अशा स्पर्धा ग्रामीण भागामध्ये भरवून स्नेहबंध ग्रामविकास प्रतिष्ठान ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगले व्यासपीठ निर्माण करून देत आहे. प्रथम पारितोषिक १५ हजार शिवसेना शिंदे गटाचे पारनेर तालुकाध्यक्ष विकास उर्फ बंडू रोहोकले, द्वितीय पारितोषिक ११ हजार पारनेर नगरपंचायत नगरसेवक तसेच पारनेर तालीम कुस्ती संघ अध्यक्ष पै. युवराज पठारे, तृतीय पारितोषिक ९ हजार,

पंचायत समिती सदस्य पोपट चौधरी, युवा उद्योजक संदीप रोहोकले (वैभव डेरी भाळवणी), चतुर्थ पारितोषिक ७ हजार उत्तर विभागीय सल्लागार रयत शिक्षण संस्था राजू गायकवाड,

पाचवे पारितोषिक ५ हजार सोमेश्वर ऑफसेट भाळवणी दिलीप रोहकले व अमोल भागुजी सासवडे (मॅनेजर बँक ऑफ इंडिया पुणे) यांनी या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी बक्षिसे दिले आहेत. यावेळी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेश फी ७०१ रुपये आहे.

स्नेहबंध ग्रामविकास प्रतिष्ठान ग्रामीण भागातील युवकाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील असते. वर्षभरामध्ये स्नेहबंध ग्राम विकास प्रतिष्ठान विविध उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामविकास करण्याचे स्वप्न उराशी बाळगत आहे.

भविष्यात गावातील विकासात्मक विविध कार्यक्रम राबविण्याचा संकल्प आहे. अशी माहिती युवा नेते शिवसेना उपतालुकाप्रमुख सुभाष सासवडे, राहुल सासवडे, माऊली राहींज, पप्पू फाकट, संकेत नाईकवाडी, नंदू भांड, इंदर गायकवाड, यांनी दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे