यंदाच्या विश्वचषकातील पहिले द्विशतक;१२८ चेंडूंत १० षटकार व २१ चौकारांच्या सहाय्याने नाबाद २०१ धावा

1 min read

दिल्ली दि.८:-अफगाणिस्तान संघाने ५० षटकांत पाच गडी गमावत २९१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या जॉश हेझलवूडने दोन फलंदाज बाद केले. २९२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचे फलंदाज अफगाणी गोलंदाजांच्या माऱ्यासमोर झटपट बाद होऊ लागले. ऑस्ट्रेलियाची अवस्था १८व्या षटकात सात बाद ९१ अशी दयनिय झाली होती.

मात्र, मॅक्सवेलने पॅट्रिक कमिन्सला बरोबर घेत २०२ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलने यंदाच्या विश्वचषकातील पहिले द्विशतक करून दाखविले. तोच सामनावीर ठरला. अफगाणिस्तानकडून नवीन उल हक, अझमातुल्लाह ओमरझाई व रशिद खानने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत काल (मंगळवारी) ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान यांच्यात सामना झाला. यात ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने एकहाती सामना खेचून आणून संघाला विजय मिळवून दिला. त्याने १२८ चेंडूंत १० षटकार व २१ चौकारांच्या सहाय्याने नाबाद २०१ धावा केल्या.

हा सामना ऑस्ट्रेलियाने तीन गडी व १९ चेंडू राखून जिंकला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानकडून सलामीवीर इब्राहिम झद्रानने नाबाद १२९ धावा केल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे