आळे येथील पिंपळगाव जोगा डावा कालव्याच्या पोटचारीचा प्रश्न मार्गी:- आशा बूचके 

1 min read

आळेफाटा दि.१०:- आळे, राजुरी गावातील शेतक-यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला विषय पिपंळगाव जोगा डावा कालवा व पोटचा-यांसाठी ज्या शेतक-यांच्या जमिनी गेल्या आहेत अश्या अनेक शेतक-यांच्या जमिनीची नुकसान भरपाई अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना भेटली नसुन आळेे

गावातील आगरमळा, बाभळबन, तितरमळा, आनंदवाडी व चिंचकाई ओढा येथील लोकांना चारी होऊन देखील चिंचकाई ओढ्यावर पूल नसल्या कारणाने अनेक वर्ष पाणी मिळत नव्हते तसेच गावची पाणी वापर संस्था स्थापन करणे

व राजुरी येथील २४ नंबर चारीचा प्रश्न या संदर्भात जि.प.च्या माजी सदस्या व भाजपा नेत्या आशा बुचके यांनी गुरूवार दि.२ रोजी सिंचन भवन पुणे येथे सर्व संबंधित खात्याच्या अधिकारी वर्ग यांच्यासमवेत मिटिंग आयोजित केली होती.

या मिटिंगमध्ये अनेक विषयावर चर्चा झाली यामध्ये, चिंचकाई ओढ्यावर पुलाचे लवकर काम करणे आणि कॅनॉल व चाऱ्याच्या नुकसान भरपाई संदर्भात ६ प्रकारणाचे मूल्यांकन करून दर निश्चित करून शेतकऱ्याना मोबदला देणें, आळे, संतवाडी, कोळवाडी गावची पाणीवापर संस्था स्थापन करणे अशी चर्चा झाली.

या प्रसंगी वेळी जलसंपदा विभाग पुणे मुख्य अभियंता धुमाळ,उप जिल्हाअधिकारी भू संपादन पुणे पाटोळे कुकडी कार्यकरी अभियंता प्रशांत कडूस्कर , सोनजे, हांडे तसेच वारूळवाडी ग्रामपंचायत सरपंच राजु मेहेर,

येनेरे गावचे सरपंच अमोल भुजबळ संतवाडी गावचे सरपंच नवनाथ निमसे, राजुरी गावच्या ग्रामपंचायतीच्या सदस्या शितल हाडवळे, गणेश गुंजाळ, निलेश दत्तातत्र भुजबळ, राजुरी येथील रविंद्र हाडवळे, माऊली हाडवळे, सिताराम जेडगुले, सुषमा हाडवळे आदी शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे