अवकाळी पावसामुळे आदिवासी भागामध्ये भात शेतीची परीस्थिती चिंताजनक
1 min readआंबेगाव दि.११:- आंबेगाव, तालुक्यामधील हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्याया चक्राने हिसकावून घेतला आहे. ऐन दिवाळीमध्ये आदिवासी भागातील कोंढवळ, राजपूर, फळोदे, तळेघर, चिखली, पोखरी, राजेवाडी, गोहे बु,
जांभोरी, पाटण, पिपरी, साकेरी, म्हाळुंगे,मेघोली, दिगद, कुशिरे, भोईरवाडी, कोंढरे, नानवडे, पिंपरगणे, आसाणे, आघाणे, तिरपाड, डोण, अडिवरे आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागातील आदिवासी भागामध्ये बहुतांश गावांमध्ये भात शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे.
सध्या दिवाळीचे दिवस चालू आहेत आणि शेतकरी भात काढणीला लागलेला आहे. अशा मध्ये निसर्गाने केलेला हा आघात ज्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे.