गुंजाळवाडी ग्रामपंचायत २० वर्षा नंतर सत्ता परिवर्तन; नयना गुंजाळ सरपंच पदी
1 min readबेल्हे दि.११:- गुंजाळवाडी (ता.जुन्नर) ग्रामपंचायत निवडणुकीत २० वर्षा नंतर परिवर्तन झाले असून नयना गुंजाळ या सरपंच झाल्या आहेत. श्री मुक्ताबाई ग्राम विकास परिवर्तन पॅनल ची ८ / १ ने सत्ता आली आहे. यंदा सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण होत एकूण नऊ जागांसाठी ही लढत झाली. तीन वार्ड असून प्रत्येक वार्ड मधून तीन सदस्य उभे होते.
वार्ड क्रमांक एक मध्ये दोन ओपन महिला राखीव व एक ओपन पुरुष आरक्षित होते. यामधून संगिता बोरचटे, संतोष गुंजाळ, आशा गुंजाळ (श्री मुक्ताबाई ग्रामविकास पॅनल )
निवडून आले आहेत.एक वार्ड क्रमांक दोन मध्ये एक महिला राखीव व दोन ओपन पुरुष आहेत. गोरक्ष गुंजाळ,कविता बोरचटे व राहुल बोरचटे हे निवडून आले आहेत.
तर वार्ड क्रमांक तीन मध्ये दोन महिला राखीव तर एक ओपन पुरुष असून यातून गोविंद गुंजाळ, दिपाली बोरचटे, सुनीता बोरचटे निवडून आले आहेत.गेल्या पंचवार्षिक मध्ये किसन बोरचटे यांच्या (सर्वपक्षीय) मुक्ताबाई परिवर्तन पॅनल व राष्ट्रवादी पुरस्कृत लहू गुंजाळ यांचा मुक्ताई पॅनल यात दुरंगी लढत झाली होती. मुक्ताई पॅनल ने एक हाती सत्ता मिळवत सर्व जागा जिंकून लहू गुंजाळ हे लोकनियुक्त सरपंच झाले होते.