वडगाव आनंद ग्रामपंचायतीमध्ये मातबरांना धक्का; मतदारांची नवीन चेहऱ्यांना पसंती
1 min readआळेफाटा दि.६:- जुन्नर तालुक्यातील महत्वाची समजली जाणारी महत्वाच महसूली गाव असणारी आळेफाटा व्याप्तीप्राप्त असणारी वडगाव आनंद (तालुका.जुन्नर) येथील ग्रामपंचायतीमध्ये १६ ग्रामपंचायत सदस्य असुन सरपंच पदी बिनविरोध रेलिका अरूण जाधव यांची बिनविरोध निवड झाली.
असून अर्चना नितीन काशिकेदार, वैशाली संजय जाधव, अल्पना सचिन देवकर, संदिप सुखदेव गडगे, संतोष रेवबा पादीर, कल्पना संपत पादीर, ऋषिकेश पांडुरंग गडगे, निशा नवनाथ वाळुंज हे ९ सदस्य बिनविरोध निवडून आले तर ७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत वार्ड क्र 1 मधून गणेश मच्छिंद्र भुजबळ (२९७),
वंदना अरविंद शिंदे(३०१), वार्ड क्र 2 मधून प्रफुल भाऊसाहेब इथापे(४२४), वार्ड क्रमांक ४ मधून गोरक्षनाथ तानाजी देवकर(४७४), वार्ड क्रमांक ५ मधून सोमनाथ गोविंद गडगे(३७१), शोभा संतोष शिंदे(३१३), अश्विनी राम चौगुले(४५०) हे उमेदवार निवडुन आले आहेत.
या निवडणुकीत सचिन दत्तात्रय वाळुंज व कैलास बाबुराव वाळुंज या मातबर उमेदवरांना पराभवाचा धक्का बसला. विजयी उमेदवार प्रफुल्ल इथापे व गणेश भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी जेसीबी ने भंडाराची उधळण करीत पारंपरिक वाद्य यासह डीजे च्या तालावर आपला विजयोत्सव साजरा केला.