जुन्नरमध्ये १० वाजता सुरू होणार मतमोजणी; ७ फेऱ्यात होणार मोजणी पूर्ण; नारायणगावचे पहिल्या तर बेल्हेचे दुसऱ्या फेरीत चित्र होणार स्पष्ट
1 min readजुन्नर दि.५:- ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी १० वाजता सुरू होणार असल्याची माहिती जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली. जुन्नर तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीची मोजणी ७ फेऱ्यांमध्ये होणार असून पहिली फेरी नारायणगावची होणार आहे.
यासाठी १५ टेबल लावण्यात येणार आहेत. दुसरी फेरी बेल्हे, वडगाव यांची असणार आहे. तिसरी फेरी पिंपळवंडी व डोंगरवाडीची असणार आहे.
चौथी फेरी कांदळी, उंब्रज क्रमांक १ व सांगनोरेची असणार आहे. पाचवी फेरी पाडळी, आंबेगव्हाण, निमगिरी व खटकाळ्याची होईल. सहावी फेरी खामगाव, धालेवाडी तर्फे मिन्हेर, राळेगण, सुकाळवेढे, बुचकेवाडीची असणार आहे. सातवी फेरी शिरोली तर्फे आळे, गुंजाळवाडी, रानमळा तांबेवाडी, पांगरी तर्फे मढ व उसरानची असणार आहे.
मतमोजणी अतिशय शांततेमध्ये करण्यात येणार असून मतमोजणी प्रतिनिधींनी उमेदवारांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी केले आहे.