बेल्हे ग्रामपंचायत निवडणुकीत ५६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद; ७७.५० टक्के मतदान
1 min read
बेल्हे दि.५:- बेल्हे (ता. जुन्नर) ग्रामपंचायत निवडणुकीत सतरा सदस्य जागासाठी ५२ उमेदवार रिंगणात राहिले. सरपंच पदासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायतच शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाल असून वार्ड क्रमांक पाच चे मतदान उशिरापर्यंत पावणेसात पर्यंत सुरू होते.
बेल्हे ग्रामपंचायत सरपंच पद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलासाठी राखीव असून या जागेसाठी चार उमेदवार महिला निवडणुकीच्या रिंगणात आहे.
सरपंच पदासाठी संगीता विजय घोडके, मनीषा जाणकू डावखर,वैशाली मोहन मटाले,गंगुबाई सखाराम मूलमुले हे उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत सदस्यांच्या एकूण सतरा जागांसाठी ५२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
बेल्हे ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग १ मध्ये तीन जागेसाठी लढत असून या प्रभागात ७४१ पुरुष-७४८ स्त्री असे एकूण १४८९ मतदार असून त्यापैकी ११५३ मतदान झाले आहे.
प्रभाग २ मध्ये तीन जागेसाठी लढत असून या प्रभागात पुरुष ६७७-स्त्री ६२३ असे एकूण १३०० असून त्यापैकी १०२५ मतदारांनी मतदान केले आहेत.
प्रभाग ३ मध्ये दोन जागेसाठी लढत असून या प्रभागात पुरुष ४२५-स्त्री ३९५ असे एकूण ८२० मतदार असून त्यापैकी ६७३ मतदारांनी हक्क बजावला आहे.
प्रभाग ४ मध्ये तीन जागेसाठी लढत असून या प्रभागात पुरुष ५६४ तर स्त्री ५७८ असे एकूण ११४२ मतदार आहेत. त्यापैकी ८१८ मतदारांनी हक्क बजावला आहे.
प्रभाग ५ मध्ये तीन जागेसाठी लढत असून या प्रभागात पुरुष ४५५-स्त्री ४४१ असे एकूण ८९६ मतदार आहेत त्या पैकी ६९४ मतदान झाले आहे.
प्रभाग ६ मध्ये तीन जागेसाठी लढत असून या प्रभागात पुरुष ५६२- स्त्री ६११ असे एकूण ११७३ पैकी ९२३ मतदान झाले आहे.
या निवडणुकीत पुरुष ३४७३ तर स्त्री ३३४७ असे एकूण ६८२० पैकी ५२८६ मतदान झाले आहे. एकूण अंदाजे ७७.५० टक्के मतदान झाले आहे. उद्या सोमवार दि.६ रोजी जाहीर सरपंच कोण हे जाहीर होणार आहे.