बेल्हे ग्रामपंचायत १३/४ ने धुव्वा; सरपंचपदी मनिषा डावखर
1 min readबेल्हे दि.६:- बेल्हे (ता. जुन्नर) येथील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री बेल्हेश्वर ग्रामविकास पॅनलच्या ‘ मनिषा जानकू डावखर ‘ यांनी बहुमताने विजय संपादन केला. यावेळी मनिषा डावखर यांनी त्यांच्या नजीकच्या प्रतिस्पर्धी श्री मुक्ताईमाता ग्रामविकास पॅनलच्या संगीता विजय घोडके यांचा पराभव केला.
बेल्हे येथील ग्रामपंचायतीचे सरपंचपद इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. सरपंच पदाच्या जागेसाठी श्री बेल्हेश्वर ग्रामविकास पॅनलच्या मनिषा जानकू डावखर, श्री मुक्ताईमाता ग्रामविकास पॅनलच्या संगीता विजय घोडके व श्री भैरवनाथ – मुक्ताईमाता ग्रामविकास पॅनलच्या वैशाली मोहन मटाले तसेच अपक्ष उमेदवार गंगुबाई सखाराम मुलमुले हे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
तर ग्रामपंचायत सदस्यपदाच्या एकूण १७ जागांसाठी तीनही पॅनलचे व १ अपक्ष मिळून एकूण ५२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने अटीतटीची झालेली निवडणूक विशेष रंगतदार ठरली.
सरपंच पदाच्या निवडणुकीत श्री बेल्हेश्वर ग्रामविकास पॅनलच्या मनिषा जानकू डावखर यांनी, त्यांच्या नजीकच्या प्रतिस्पर्धी श्री मुक्ताईमाता ग्रामविकास पॅनलच्या संगीता विजय घोडके यांचा पराभव केला.
यावेळी श्री बेल्हेश्वर ग्रामविकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी भंडारा उधळत विजयाचा जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला.तर ग्रामपंचायत सदस्यपदाच्या एकूण १७ जागांपैकी श्री बेल्हेश्वर ग्रामविकास पॅनलचे १३ उमेदवार विजयी झाले.
तर श्री मुक्ताईमाता ग्रामविकास पॅनलला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान श्री भैरवनाथ मुक्ताईमाता ग्रामविकास पॅनलला एकाही जागेवर विजय मिळवणे शक्य झाले नाही.
या निवडणुकीत श्री बेल्हेश्वर ग्रामविकास पॅनलचे वार्ड क्रमांक १ मध्ये – समिर गोरक्षनाथ गायकवाड, दिपाली संजय मटाले, वार्ड क्रमांक २ मध्ये – कैलास बाबाजी आरोटे, राजेंद्र बबन पिंगट, वार्ड क्रमांक ३ मध्ये – नवनाथ बाबुराव शिरतर, पल्लवी स्वप्नील भंडारी, वार्ड क्रमांक ४ मध्ये – कमल गजानन घोडे, वार्ड क्रमांक ५ मध्ये – नाजीम गुलाब बेपारी, योगिता नितीन बांगर, विद्या अजिंक्य भालेराव, तर वार्ड क्रमांक ६ मध्ये – किरण तान्हाजी गुंजाळ, शारदा धनंजय बांगर, ताराचंद लक्ष्मण मुलमुले हे १३ उमेदवार विजयी झाले.
श्री मुक्ताईमाता ग्रामविकास पॅनलचे वार्ड क्रमांक १ मध्ये – अनिता देविदास पिंगट, वार्ड क्रमांक २ मध्ये – अनन्या मंगेश तपासे, वार्ड क्रमांक ४ मध्ये – नाजिम नसिर बेपारी, मंदाकिनी रमेश नायकोडी हे ४ उमेदवार विजयी झाले.
दरम्यान श्री भैरवनाथ मुक्ताईमाता ग्रामविकास पॅनलच्या सर्वच उमेदवारांना पराभवास सामोरे जावे लागले.