जुन्नर तालुक्यात कापसाचे उत्पादन घटले ; यंदा भाव ही कमी
1 min read
बेल्हे दि ४:- बहुदा विदर्भ व मराठवाड्यात घेतले जाणारे पीक ज्याची ओळख ‘पांढर सोन’ अशी आहे म्हणजेच कापूस. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील साकोरी, मंगरूळ, पारगाव, झापवाडी, बेल्हे, बोरी या पिकाची काही शेतकऱ्यांना आवड लागली आहे. सद्या कापसाची वेचणी चालू असून हे पीक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.जुन्नर तालुक्याचे वातावरण या पिकासाठी योग्य आहे परंतु पावसा अभावी यंदा कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. इतर पिकांपेक्षा कमी मशागत करावी लागते. आवश्यकते नुसार तीन चार वेळा फवारणी केली जाते. तरकारी पिकांना शेतकऱ्यांना खूप मेहनत करावी लागते. तरकारी पिकाला भाव कधी कमी तर कधी जास्त मिळतो. भाव कमी मिळाला की शेतकऱ्याला नुकसानीला सामोर जावं लागतं.
यंदा कापसाला फुल याच्या वेळेला पावसाने दडी मारल्यामुळे मोठया प्रमाणात फुलांची गळती झाली. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे.भाव कमी असल्यामुळे उत्पादन खर्च निघत नाही. फवारणी, वेचणी मजुरीचा खर्च मोठा असतो. शेतमजूर कापूस वेचण्यासाठी मिळत नाहीत. कापसाचे पीक शेतकऱ्यांचे शक्यतो नुकसान करणार पीक नाही.
तसेच कापूस विकण्यासाठी साकोरीत येथे बाजारपेठ आहेत. साकोरी गावातील काही शेतकरी गेल्या ५ ते ६ वर्षांपासून कापसाचे पीक आपल्या शेतात घेत आहेत. कापूस काढल्यानंतर शेतात दुसरे पीक ही घेता येते.
मागील आठवड्यात ६८ ते ७० रुपये बाजार भाव होता. तीन दिवसांपूर्वी ६४ ते ६८ रुपये तर सध्या ७० ते ७२ रुपये मिळत आहे.
—————-
‘पावसाअभावी उत्पादनामध्ये घट झाली आहे, त्यात यंदा कापसाला बाजार भाव कमी असल्यामुळे उत्पादन खर्च निघणे मुश्किल झाले आहे. किमान दहा हजार रुपये भाव मिळावा अशी अपेक्षा आहे.’
दत्तात्रय विश्वासराव
कापूस उत्पादक शेतकरी साकोरी