सरदार पटेल हायस्कूलच्या ३५० विद्यार्थ्यांना मिसळ पावची मेजवानी
1 min read
आणे दि २२:- सरदार पटेल हायस्कूल मध्ये आणे गावचे माजी सरपंच शांताराम दाते यांच्या दातृत्वातून सर्व विद्यार्थ्यांसाठी मिसळपाव’ची मेजवानी देण्यात आली.
याचे नियोजन डॉ.अमोल दाते व शुभांगी भोसले या भावंडांनी आपल्या शाळेच्या प्रेमापोटी केले असल्याचे शांताराम दाते यांनी सांगितले.सुमारे चार टोप मिसळ, दीडशे किलो शेव,अठराशे पाव असा मेजवानीचा बेत आखला होता आणि विद्यालयातील साडेतीनशे विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद तसेच व्यवस्थापन समिती सदस्यांनी या मिसळपाव’ चा आस्वाद घेतला. अशी माहिती मुख्याध्यापक शिंदे डी.एस.यांनी दिली.