विद्यानिकेतन च्या बालचमूचा प्रत्यक्ष बळीराजा सोबत बैलपोळा साजरा; बैलपोळा संस्कृती जतन करणारा सण

1 min read

साकोरी दि.२१:- बैलपोळा हा सण विद्यानिकेतन साकोरी (ता.जुन्नर) च्या बालचमू नी प्रत्यक्ष बळीराजा सोबत साजरा केला. पूर्व प्राथमिक विभागाच्या प्राचार्या रुपाली पवार (भालेराव) यांनी बैलाचे औक्षण केले. तसेच बैलपोळा हा सण का साजरा केला जातो याचे महत्व सुलभा डेरे यांनी विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.

या वेळी गोफने मॅडम ,चासकर मॅडम ,पाचपुते मॅडम ,या ही उपस्थित होत्या. या सुंदर उपक्रमाविषयी विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम चे प्राचार्य अमोल जाधव ,पी एम हायस्कुल च्या प्राचार्या शेगर यांनी देखील विशेष कौतुक केले. खर तर आजच्या धकाधकीच्या जीवनात सण उत्सव साजरे केले जातात परंतु वेळेअभावी तितकेसे त्या सणाचे महत्व मुलांपर्यंत पोहचत नाही.

जवळपास ९९% टक्के शेतकऱ्यांची मुले विद्यानिकेतन संकुलनात शिक्षण घेतात. परंतु सर्वांच्या च घरी बैल नसतात परंतु त्यामुळे शाळेचे संस्थापक पी. एम.साळवे आणि त्यांचे बंधू दत्ता मनाजी साळवे यांच्या घरी अजूनही बऱ्याच बैलजोडी अजूनही पहायला मिळतात. हा सण सर्जा राजाचा सण म्हणजेच बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी बांधव बैलांना पहाटे अंघोळ घालतात त्यांना खुप सजवले जाते शिंगांना रंग दिले जातात, झुल चढवली जाते.

तसेच पुरणपोळी चा गोड नैवेद्य दाखविला जातो. या दिवशी बैलांनकडून कोणतेही कष्टाचे काम करू दिले जात नाही तसेच सायंकाळी त्यांची गावात वाजत गाजत मिरवणूक काढली जाते .हिंदू संस्कृती मध्ये वृक्षांप्रमाणे वन्यजीवांना ही पूजनीय मानले जाते .या सणानिमित्ताने मुक्या प्राण्यांविषयी आपुलकी आणि प्रेम निर्माण होऊन आपण सर्वांनी तसेच उद्याची भावी पिढी देखील या सर्व परंपरा आणि सण उत्सव आनंदाने आणि उत्साहात साजरी करतील ही आशा बाळगूयात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे