रक्षकच भक्षक, अल्पवयीन मुलीशी ओतूरच्या पोलिस नाईकचे अश्लील चाळे; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

1 min read

नारायणगाव दि.३:- नारायणगावच्या जवळच असणाऱ्या एका दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करण्याचा गंभीर प्रकार ओतूर (ता. जुन्नर) पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक नारायण भाऊसाहेब बर्डे (वय ३८) रा. आकाशगंगा आळेफाटा, ता.जुन्नर जिल्हा पुणे.) याने केला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या पोलिसाने हे घृणास्पद कृत्य केले असल्याने संतापाची भावना आहे. बर्डे विरुद्ध विनयभंग आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार चौथी इयत्तेत शिक्षण घेत असलेली सदर अल्पवयीन मुलगी सोमवार (दि.२) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खाजगी क्लास मधून पायी घरी निघाली होती.

दरम्यान आरोपी नारायण बर्डे याने तुला शंभर रुपये देतो मोटरसायकलवर बस असा आग्रह धरला. मुलीने नकार दिल्याने त्याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

घरी जाऊन मुलगी रडू लागली. घडलेली घटना तिने आजीला सांगितली. मुलीच्या पालकांनी आरोपीचा शोध घेतला असता घटनास्थळ परिसरातच आरोपी आढळून आला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

आरोपीने केलेल्या कृत्याचे सीटीव्ही फुटेज नागरिकांनी पोलीस स्टेशनला दिले आहेत. मुलीच्या वडिलांनी सोमवारी रात्री उशिरा पोलीस नाईक नारायण बर्डे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

आरोपी ओतुर पोलीस स्टेशनमध्ये मागील चार वर्षापासून सेवेत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे हे करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे