जाधववाडीत गावठी दारू बनवण्याची हातभट्टी आळेफाटा पोलिसांनी केली उध्वस्त 

1 min read

बेल्हे दि.१०:- जुन्नर तालक्यातील जाधववाडीत गावठी हातभट्टी दारू तयार करणारी भट्टी आळेफाटा पोलिसांनी उध्वस्त केली असून अमोल मच्छिंद्र बर्डे (रा. जाधववाडी ता. जुन्नर जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत आळेफाटा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेली माहिती अशी की सोमवार दि. 9 रोजी 08:00 वाजता जाधववाडी गावचे हददीत कुकडी नदीच्या किनाऱ्यावर हातभट्टी दारू बनवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

सदर ठिकाणी पोलिस गेले असता आरोपी याने बेकायदेशीर रित्या आपले कब्जात गावठी हातभट्टीची तयार दारू तसेच आपले देखरेखी खाली गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याच्या उद्देशाने एकूण 200 लिटर मापाचे 06 निळे रंगाचे बॅरल तसेच 15 लिटर मापाचे 30 पत्र्याचे डबे पोलिसांना आढळून आले.

यामध्ये गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी कच्चे रसायन रापत ठेवलेले 1650 लिटर सदर रापत ठेवलेल्या कच्चे रसायन ज्यामुळे मनुष्याच्या शरीरास हानी पोहोचेल व त्यास मुच्छा येईल असे विषारी कच्चे रासायन केलेले असे साधना सह एकूण 1,72,200/- रुपयाचा प्रोव्हिशन माल पोलिसांना मिळून आला.

पोलिसांनी भट्टी उध्वस्त केली. पोलिस पाहून सदर आरोपी पळून गेला. सदर आरोपी बाबत आळेफाटा पोलीस स्थानकाचे पोलीस अंमलदार केशव भागवत कोरडे यांनी फिर्याद दिली असून अमोल मच्छिंद्र बर्डे रा. जाधववाडी ता. जुन्नर जि. पुणे यांच्या विरुद्ध सरकारतर्फे भा.द.वि. कलम 328 व मु.प्रो.का.क.65 (ख)(ग) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.पोलीस निरीक्षक आळेफाटा वाय. के. नलावडे यांच्या मार्गदर्शना खाली पोसई कराळे करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे