सुरकुलवाडीत अवैद्य देशी दारू विक्री दुकानावर बचत गटातील महिला व आळेफाटा पोलिसांची कारवाई
1 min read
नळवणे दि.३:- नळवणे (ता.जुन्नर) येथील सुरकुलवाडी येथे अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्या एका दुकानदारावर आळेफाटा पोलीस तसे बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन कारवाई केली. यामध्ये नारायण परशुराम शिंगाळ वय ६५) व संजय काशिनाथ शिंगाळ (वय ४१ वर्षे) रा – सुरकुलवाडी नळावणे ता-जुन्नर .जि-पुणे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की सोमवार दिनांक २ रोजी दुपारच्या दरम्यान आळेफाटा पोलीस तसेच महिला ग्रामस्थ, बचत गटातील महिला, यांनी अवैधरित्या सुरू असलेल्या देशी दारू विक्री केंद्राचा पोलखोल केला व पोलिसांनी धडक कारवाई केली.
या कारवाईत एकूण १३ जीएम संत्रा कंपनीच्या कॉटर १८० मिली मापाच्या प्रत्येकी किंमत ७० रुपये किमितीच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. सुरकुलवाडी गावातील नारायण परशुराम शेंगाळ यांनी घराच्या पाठीमागे आडोशाला हा बिगर परवाना देशी दारूचा व्यवसाय सुरू केला होता.
यात ऐकुन ९१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.अशी फिर्याद आळेफाटा पोलिस स्थानकाचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन लहानु राहणे (वय ३५) यांनी दिली आहे.
यावेळी वेळी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, विकास गोसावी तसेच ग्रामस्थ नळवणे, सुरकुलवाडी गावच्या महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.