राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ,दिलीप वळसे पाटील शनिवारी जुन्नर तालुक्यात
1 min readओझर दि.३:- थोर स्वातंत्र्यसेनानी ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी १९७४ साली सुरू केलेल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत या संघटनेला पंन्नास वर्ष पूर्ण होत असून हा सुवर्ण महोत्सव शुभारंभ सोहळा शनिवार दि. ७ व रविवार दि. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी श्री क्षेत्र ओझर ता.जुन्नर जि. पुणे येथे संपन्न होणार आहे.या सुवर्ण महोत्सव शुभारंभासाठी प्रमुख उपस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न नागरी व ग्राहक सरंक्षणमंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शहा, राष्ट्रीय महामंत्री दिनकर सबनीस, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुर्यकांत पाठक, राष्ट्रीय सचिव अरूण देशपांडे, ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष मा.न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे. शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार संसदरत्न डॉ.अमोल कोल्हे, जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या सुवर्ण महोत्सवी सोहळयासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ग्राहक चळवळीत कार्यरत असणारे सुमारे दोन हजार पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.या दोन दिवसांच्या सुवर्ण महोत्सव सोहळयाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून राज्य सेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे, परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, महाराष्ट्र सायबर सुरक्षा पोलीस अधिक्षक संजय शिंतरे, महाविरण कंपनीचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, जन आरोग्य अभियानाचे डॉ.अनंत फडके, राष्ट्रीय स्व संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रविण दबडगावकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.या सुवर्ण महोत्सव सोहळयामध्ये ग्राहक प्रबोधन यात्रा, प्रर्दशने व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहीती अखिल ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष बाळासाहेब औटी, प्रांत संघटन मंत्री प्रसाद बुरांडे, प्रांत सचिव संदिप जंगम यांनी नारायणगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.