राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज जुन्नरच्या दौऱ्यावर

1 min read

जून्नर दि.१:- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार आज रविवारी दि.१ रोजी जुन्नर तालुक्यात येणार असून बिरसा ब्रिगेड आदिवासी राष्ट्रीय परिषद २०२३ ला ते मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.या वेळी त्यांच्या समवेत बिरसा ब्रिगेड सह्याद्रीचे कार्याध्यक्ष डॉ. विनोद केदारी, बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब दराडे, जिल्हाध्यक्ष प्रवीण पारधी व पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शुभम भवारी उपस्थित होते.

आमदार बेनके म्हणाले, या परिषदेला इतर कोणत्याही संघटनेचा विरोध नाही. खा. शरद पवार हे विघ्नहर कारखान्यावर हेलिकॉप्टरने येणार असून, तेथून ते विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. त्यानंतर ते माजी आमदार वल्लभ बेनके यांना भेटायला येणार आहेत.

त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करून ते जुन्नर येथे सभेला जातील. बिरसा ब्रिगेड सह्यादीचे कार्याध्यक्ष डॉ. विनोद केदारी म्हणाले, बिरसा ब्रिगेड ही संघटना आदिवासी समाजाच्या अडचणी सोडविण्याचे काम करीत आहे.

या मेळाव्याला महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहारी झिरवळ, बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंदाम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला आदिवासी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे