प्रतीक्षा संपली ! माजी आमदार शरद सोनवणे यांनी केल्या ‘या’ चार घोषणा

1 min read

आळेफाटा दि.२९:- जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी आज वाढदिवस असून आज वाढदिवसाचे औचित्य साधून शरद सोनवणे हे महत्वाच्या चार घोषणा केल्या.

त्या मध्ये पहिली घोषणा १ गोंद्रे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार, घोषणा २ सर्वात मोठा भगवा ध्वज उभारणार, घोषणा ३ मोठे सुसज्ज हॉस्पिटल उभारणार, घोषणा ४ शिवरायांचे जगातील पाहिले सुवर्ण मंदिर गोद्रे मध्ये उभारणार अशा घोषणा केल्या.

आळेफाटा येथील तुळशी पॅलेस येथे कार्यकर्त्यांनी आमदार शरद सोनवणे यांची भव्य मिरवणूक काढली. जगात सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जुन्नर तालुक्यात उभारला जाणार असल्याची ही पहिली घोषणा माजी आमदारांनी यापूर्वीच केली होती.

शरद सोनवणे यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देण्यासाठी तसेच घोषणा ऐकण्यासाठी अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे