माजी आमदार शरद सोनवणे यांची घोषणा करण्यापूर्वी भव्य मिरवणूक; थोड्याच वेळात करणार घोषणा; कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला
1 min read
आळेफाटा दि.२९:- जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांचा आज वाढदिवस असून आज वाढदिवसाचे औचित्य साधून शरद सोनवणे हे मोठ्या तीन घोषणा करणार असल्याने आळेफाटा येथील तुळशी पॅलेस येथे कार्यकर्त्यांनी आमदार शरद सोनवणे यांची भव्य मिरवणूक काढली आहे. या मिरवणुकीमध्ये हजारो कार्यकर्ते उपस्थित असून थोड्याच वेळात घोषणा केल्या जाणार आहे. जगात सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जुन्नर तालुक्यात उभारला जाणार असल्याची ही पहिली घोषणा माजी आमदारांनी यापूर्वीच केली होती.
तर इतर घोषणांकडे सर्व लक्ष लागलं असून थोड्याच वेळात या घोषणा होणार आहेत शरद सोनवणे यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देण्यासाठी तसेच घोषणा ऐकण्यासाठी अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत.