क्रिएटिव्ह ग्लोबल फाऊंडेशन च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना टॅब वाटप
1 min read
राजुरी दि.११:- क्रिएटिव्ह ग्लोबल फाऊंडेशन च्या वतीने व SDK कंपनी च्या माध्यमातून राजुरी बेल्हे भागातील सात शासकीय शाळांमधील दहावीतील प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात येणार आहे. याची सुरुवात राजुरी येथील विद्या विकास मंदिर या विद्यालयाची विद्यार्थीनी चैतन्या मंगेश हाडवळे (97.20%) हिला संस्थेचे अध्यक्ष स्मिता पंकज कणसे यांच्या व पंकज कणसे शुभहस्ते देऊन करण्यात आली.या प्रसंगी
राजुरी ग्रामपंचायत सदस्य गौरव घंगाळे, सामाजिक कार्यकर्ते रवी हाडवळे, अशोक हाडवळे, सचिन हाडवळे, गणेश हाडवळे, मंगेश हाडवळे, भावेश औटी, विलास घंगाळे, सुजित बनकर, आबा काळे, राजाभाऊ औटी, निकेतन औटी, शशांक हाडवळे, मयूर जाधव
तात्याभाऊ हाडवळे व इंदुबाई हाडवळे आजी आजोबा उपस्थित होते.