सरपंचांच्या मनमानी कारभाराला कंटाळून नळवणे ग्रामपंचायतीच्या ८ सदस्यांचे राजीनामे

1 min read

नळवणे दि.२०:- जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील नळवणे गावच्या सरपंच अर्चना उबाळे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामपंचायत च्या आठ सदस्यांनी आपले राजीनामे ग्रामसेवक गुलाब जगताप यांच्याकडे दिले आहेत. ग्रामपंचायत कार्यकारणी बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

अशी माहिती राम गगे यांनी दिली. 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावकऱ्यांनी मोठ्या मताधिक्यांनी अर्चना उबाळे यांना सरपंच पदी विराजमान केले परंतु निवडून आल्यानंतर उबाळे यांनी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना कोणत्याही कामात सहभागी करून न घेता परस्पर मनमानी कारभार चालू केला असल्याचं गगे यांनी सांगितले.

विकास कामांत कोणत्याही प्रकारची पारदर्शकता व गुणवत्ता न ठेवता सबंधित ठेकेदाराशी संगणमत करून मोठा आर्थिक घोटाळा केला असण्याची शक्यता मागच्या महिन्यात झालेल्या सभेत करण्यात आली होती.गावात विकास कामात मोठ्या प्रमाणात खंड पडला आहे. आज दि.२० रोजी ग्रामपंचायतची मासिक मिटिंग अर्चना उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी उपसरपंच संजोग शिंदे, सदस्य निकिता अशोक शिंदे, शितल भागा शेंगाळ, कविता संजय साबळे, सुखदेव निवृत्ती नवले ,सुरेश खंडू गगे ,सुवर्णा जालिंदर शिंदे, पल्लवी नवनाथ गगे ग्रामसेवक गुलाब जगताप उपस्थित होते. यावेळी सरपंच अर्चना उबाळे यांच्या मनमानीला कंटाळून राहिलेल्या बाकी आठ सदस्यांनी आपल्या सदस्य पदाचे राजीनामे सरपंच अर्चना गणेश उबाळे आणी ग्रामसेवक गुलाब विष्णू जगताप यांच्याकडे दिलेले आहेत.

“नळवणे ग्रामपंचायतीच्या नऊ पैकी आठ सदस्यांनी राजीनामे दिले माझ्याकडे दिले आहेत.सदर राजीनामे सरपंच यांच्याकडे देणे अपेक्षित होते परंतु सदस्यांनी राजीनामे माझ्याकडे दिले आहेत पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडे पाठवले जाणार असून याबाबत वरिष्ठ निर्णय घेणार आहेत.”

गुलाब जगताप,
ग्रामसेवक, नळवणे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे