दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात नवीन मतदारांसाठी ‘मतदार नाव नोंदणी अभियान’
1 min read
निमगाव सावा दि.१४:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित व श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा (ता.जुन्नर) या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत दि.१४ सप्टेंबर २०२३ रोजी, नवीन मतदारांसाठी ‘मतदार नाव नोंदणी अभियान’ राबविण्यात आले.भारतीय लोकशाहीमध्ये मतदानाला विशेष महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की, कोणत्याही गोष्टीची सुरुवात व्यवस्थितपणे आणि नियोजनबद्धरित्या करायला हवी. त्याचप्रमाणे भारतीय लोकशाहीला मजबूत करण्याचे काम या निवडणुका करत असतात आणि या निवडणुकांचा सुरुवातीचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे मतदारांची नाव नोंदणी होय.
महाविद्यालयांमध्ये १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नवीन मतदार यादीमध्ये नाव नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. छाया जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाने, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन मोजाड आणि विद्यार्थी विकास मंडळाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल सरोदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका वृंद शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.