“स्वच्छताही सेवा” दिलीप वळसे पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे श्रमदान..!

1 min read

निमगाव सावा दि.१:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, दिलीप वळसे पाटील महाविद्यालयातील, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत उपक्रमात ५६ स्वयंसेवकांनी “स्वच्छताही सेवा” या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निमगाव सावा (ता.जुन्नर) दर्शनी भाग, बाजारपेठ, बस स्टॉप तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी तीन तास स्वच्छता करून परिसर चकाचक केला. विद्यार्थ्यांनी गावातील दर्शनी भाग तसेच बाजारपेठ, बस स्टॅन्ड परिसरातील प्लास्टिक, ओला कचरा, कागद, प्लास्टिक व काचेच्या बाटल्या व इतर केरकचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत निमगाव सावा यांस कडून कचरा गाडी आणि हँडग्लोज उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. छाया जाधव, संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार यांच्या मार्गदर्शनातून, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन मोजाड आणि विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. राहुल सरोदे यांनी उत्कृष्टपणे नियोजन करून गावचे सरपंच किशोर घोडे यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे