ज्ञानराज ग्रामीण पतसंस्थेस २५ लाख ५३ हजार नफा; सभासदांना १२ टक्के लाभांश
1 min read
आळे दि.२७:- आळे येथील ज्ञानराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला २५ लाख ५३ हजार रुपये नफा झाला असून सभासदांना १२% लाभांश व दिपावली भेट वस्तू देण्याचा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप वाव्हळ यांनी दिली.पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वाव्हळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी पतसंस्थेचे संस्थापक धनंजय काळे, रामदास वाव्हळ, अँड. दत्तात्रय भागवत, उपाध्यक्ष प्रितम काळे, सचिव विठ्ठल जाधव, विठ्ठल लांडे, खजिनदार समीर टकले, संचालक जावेद मोमीन, सुधीर वाव्हळ, रामदास शिंदे, समीर आतार, संतोष लासुर्वे, संचालिका मंगल तितर.
सुप्रिया शिरतर, तज्ञ संचालक नेताजी डोके, हबीब मणियार, व्यवस्थापक लक्ष्मण औटी आदी उपस्थित होते. अध्यक्ष वाव्हळ म्हणाले, “पतसंस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असून सभासदांचा एक लाख रुपयांचा अपघात विमा उतरवला आहे. पतसंस्थेकडे २६ कोटी रुपयांच्या ठेवी असुन त्यापैकी २१ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.
गुंतवणूक ११ कोटी रुपये केली असून खेळते. भागभांडवल ३३ कोटी रुपये आहे. संस्थेमध्ये वीज बिल स्वीकृती केंद्र, तत्पर सोनेतारण कर्ज सुविधा आहे. प्रशांत सोनवणे यांनी सुत्रसंचालन, तर माजी अध्यक्ष सुधीर वाव्हळ यांनी प्रास्ताविक केले. डॉ. लांडे यांनी आभार मानले.